-0.8 C
New York
Tuesday, January 14, 2025

Buy now

गुरांची अवैध वाहतूक ; चालकाला पोलिस कोठडी

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावरून एका ट्रकमधून १९ गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्या आदमअली इसाक नेसरीकर (३४, आजरा, कोल्हापूर) याला पोलिसांनी गुरुवारी खारेपाटण तपासणी नाक्यावर ताब्यात घेतले होते. अधिक चौकशीअंती त्याला अटक केली होती. त्याला शुक्रवारी येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.

बजरंग दलाचे पदाधिकारी कृष्णा बिरबसप्पा धुळपनार (२७, कोलगाव – सावंतवाडी) यांना एका ट्रकमधून गुरांची अवैध वाहतूक होत असल्याचा संशय आल्याने काही मित्रांच्या साथीने संबंधित ट्रकचा ओरोस ते नांदगाव तेथून हुंबरट व पुढे खारेपाटण असा रात्रभर पाठलाग केला होता. अखेरीस पोलिसांच्या मदतीने खारेपाटण तपासणी नाका येथे गुरुवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास तो ट्रक पकडण्यात यश आले होते. ट्रकमध्ये १ लाख ३० हजार रुपये किमतीची १९ गुरे होती. पोलिसांनी गुरे ताब्यात घेतली होती. तर ट्रक जप्त केला होता. ट्रकचा चालक आदमअली इसाक नेसरीकर (३४, आजरा, कोल्हापूर) याला पोलिसांनी अटक केली. त्याच्यासोबत रूपेश नावाचा क्लिनर पळून गेला होता.

विशेष म्हणजे जप्त करण्यात आलेल्या ट्रकला (क्रमांक के.ए.२५ बी-१५०५) व (क्रमांक एम. एच. ४५-०३९९) अशा दोन नंबर प्लेट होत्या. यातील (एम. एच. ४५-०३९९) हा ट्रकचा खरा नंबर असल्याचे चालक आदमअली याने पोलिसांकडे कबूल केले आहे. धुळपनार यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार ट्रक चालक आदमअली इसाक नेसरीकर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!