कणकवली : कणकवली तालुक्यातील वारगाव येथे खवले मांजराची तस्करी करून असलेल्या विकण्याच्या प्रयत्नात पाच संशयितांना वनविभागाच्या पथकाने रविवारी ताब्यात घेतले होते. त्यातील एका अल्पवयीन मुलाला वगळून इतर चार आरोपींना अटक करून सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्या चार जणांना ६ डिसेंबरपर्यंत वनकोठडी मिळाली होती. ती मुदत संपल्याने त्यांना पुन्हा शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.
१ डिसेंबर रोजी दुपारी वनाधिकाऱ्यांना खवले मांजर विक्रीसाठी घेऊन काही लोक वारगाव येथे येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यामुळे सापळा रचण्यात आला. यावेळी विशाल विष्णू खाडये (३४, रा.लोरे नं. १, ता. कणकवली), संदीप तानाजी घाडी (४४, रा. मुटाट, ता. देवगड), गिरिधर लवू घाडी (४१, रा. मुटाट, ता. देवगड), गुरुनाथ धोंडू घाडी (५०, रा. मुटाट, ता. देवगड) अशा चार जणांना ताब्यात घेऊन चौकशीअंती अटक करण्यात आली होती.