3.5 C
New York
Wednesday, November 13, 2024

Buy now

निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी यंत्रणेत सहभाग घेणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याने जबाबदारीने निवडणूक प्रशिक्षण घ्यावे – निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंद्र सिंह

सिंधुदुर्ग : लोकसभेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी या यंत्रणेत सहभाग घेणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याने जबाबदारीने निवडणूक प्रशिक्षण घेण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी केले आहे. सावंतवाडी व कुडाळ येथे प्रशिक्षणासाठी उपस्थित असलेल्या सर्व अधिकाऱ्यांशी श्री. सिंह यांनी आज संवाद साधला. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाद्वारे विविधस्तरीय कार्यवाही सातत्याने व योग्य प्रकारे करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून मतदान प्रक्रियेमध्ये थेट सहभागी असणाऱ्या मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांचे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण सावंतवाडी आणि कुडाळ येथे आयोजित करण्यात आले होते. यामध्ये सावंतवाडी येथील बॅरिस्टर नाथ पै सभागृह तसेच कुडाळ येथे प्रशिक्षणासाठी उपस्थित झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांशी निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह आणि जिल्हा निवडणूक अधिकारी तथा सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी भेट देऊन संवाद साधला. तसेच प्रशिक्षणानंतर त्यांनी सावंतवाडी येथील स्ट्रॉंग रूमची पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सावंतवाडी हेमंत निकम, सावंतवाडी तहसिलदार श्रीधर पाटील, वेंगुर्ला तहसिलदार ओंकार ओतारी, दोडामार्ग तहासिलदार अमोल पवार, अप्पर तहसिलदार मोनिका कांबळे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कुडाळ ऐश्वर्या काळुसे, कुडाळ तहसिलदार विरसिंग वसावे आणि मालवण तहसिलदार वर्षा झाल्टे यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. श्री. सिंह म्हणाले की, आपल्यावर असलेली जबाबदारी ही खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यादृष्टीने आवश्यक असलेले पूरक साहित्य, त्याचा वापर, मतदान केंद्रावर घ्यावयाची आवश्यक खबरदारी या सर्व बाबी गतिमानतेने, अचूकपणे पार पाडण्याची जबाबदारी मतदान केंद्रातील अधिकारी, कर्मचारी यांची आहे. आपल्याला दिलेली जबाबदारी आणि काम अधिक चांगल्या प्रकारे पार पाडण्याच्या भूमिकेतून सर्वांनी या प्रशिक्षण कार्यक्रमांचा उपयोग करून घ्यावा, त्याचबरोबर प्रशिक्षणादरम्यान आपल्या मनात येणाऱ्या सर्व शंका व प्रश्न आपल्या प्रशिक्षकांना मनमोकळेपणाने विचारावे आणि त्यांचे निराकरण करून घ्यावे असे श्री. सिंह यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!