0.2 C
New York
Wednesday, December 4, 2024

Buy now

कळसुलीत १० रोजी स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा

कणकवली : प्रेमदया प्रतिष्ठान श्री स्वामी समर्थ मठ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार १० एप्रलिला कळसुली येथील श्री स्वामी समर्थ मठात श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा आयोजित केला आहे. यानिनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत.

पहाटे ४:३० वा. काकड आरती, ७ वा. स्वामींची नित्यपूजा, ८ वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, १०:३० वा. कीर्तन, ११:३० वा. महाआरती, १२:३० वा. महाप्रसाद, दुपारी ३ वा. स्थानिक भजनी कलाकारांची भजने, सायंकाळी ५ वा. दिंडी, ६ वा. ह. भ. प. विश्‍वनाथ महाराज गवंडळकर यांचे कीर्तन, रात्री ९:३० वा. बाळा सावंत प्रस्तुत महान पौराणिक नाटक अमृत गंगा सादर होणार आहे. तरी या सोहळ्यात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!