21.6 C
New York
Thursday, May 23, 2024

Buy now

नाटळ येथील युवकाने राहत्या घरात घेतला गळफास

कणकवली : तालुक्यातील नाटळ येथील प्रितेश उद्देश राणे ( वय – १९ रा. नाटळ राणेवाडी ) या युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मागचे समोर आलेले कारण ऐकून धक्काच बसेल.

नाटळ येथील हा १९ वर्षीय प्रितेश आपल्या आई वडिलांसमवेत मुंबईत ( भांडुप ) येथे राहत होता. त्याच गावी कनेडी कॉलेज मध्ये बारावी इयत्तेत शिक्षण सुरू होते. त्याचे कुटुंबीय कामानिमित्त मुंबई येथे राहायला असले तरी प्रितेश हा गावी आपल्या आई सोबत येऊन जाऊन असायचा. २२ मार्च ला प्रितेश त्याचा बारावीचा आयटी विषयाचा शेवटचा पेपर असल्याने आई समवेत नाटळ येथे आला होता. परीक्षेनंतर गुढीपाडवा करून प्रितेश आई समवेत मुंबई येथे पुन्हा जाणार होते. मात्र अशातच प्रितेशचं त्याच्या आई सोबत काही किरकोळ कारणावरून सतत भांडणं झालं. अलीकडेच प्रितेश आणि त्याची आई या दोघांमध्ये किरकोळ कारणांवरून भांडणं होत होती. त्या भांडणाला कंटाळून प्रितेशची आई शुक्रवारी दिगवळे येथील त्यांच्या नातेवाईकांकडे गेली होती. होत असलेल्या किरकोळ भांडणांना कंटाळून प्रितेशची आई शनिवारी सकाळी आपल्या नंदेच्या दिराच्या रिक्षेने नाटळ येथे आपले कपडे वगैरे घेऊन मुंबईला जाण्यासाठी आली असता घराच्या मागच्या बाजूचा दरवाजा उघडा दिसला. तिने घरात जाऊन पाहिले असता प्रितेश हा घरात गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आला. लागलीच प्रितेश याला खाली उतरविण्यात आले. मात्र त्यावेळी फार उशीर झाला होता. तरीही खात्रीकरिता प्रितेश याला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रितेश मृत असल्याचे घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंढे, पोलीस हवालदार विनोद सुपल, मिलिंद देसाई हे घटनास्थळी दाखल झाले होते. प्रितेश याच्या कुटुंबात आई, वडील आणि दोन बहिणी असा परिवार होता. प्रितेशने अचानक घेतलेल्या निर्णयाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!