18.9 C
New York
Wednesday, April 30, 2025

Buy now

सी.आर .चव्हाण यांची शिवसेना उ.बा.ठा.कणकवली विधानसभा विभाग समन्वयक पदी निवड

कणकवली | मयूर ठाकूर : शिवसेना उ.बा.ठा. जिल्हा शाखा सिधुदुर्गची जिल्हा कार्यकारीणीची सभा मा. अध्यक्ष संदेश पारकर यांचे अध्यक्षतेखाली,मा .सतिश सावंत विधानसभा गटनेते , मा.आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा संपन्न झाली. या सभेत विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने आखणी करण्यात आली.त्याजबरोबर काही महत्वाच्या कमिट्यांची ही रचना करण्यात आली .

यामध्ये अनु .जाती मोर्चाच्या कणकवली विधानसभा समन्वयक पदी बहुमताने श्री. सी.आर.चव्हाण यांची निवड करण्यात आली. सी. आर . चव्हाण .हे शिवसेना (उबाठा) . गटाचे सक्रीय व निष्ठावान कार्यकर्ते आहेत . तसेच ते संदेशजी पारकर यांचे विश्वासू व निकटवर्तीय म्हणून परिचित आहेत . त्यांच्या कामाची दखल घेऊन पक्ष नेतृत्वाने त्यांना ही जबाबदारी दिली आहे.

पद असो या नसो पण शिवसेनेचा निष्ठावान सैनिक म्हणून,पक्ष देईल ते काम करून , पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार आणि पक्ष देईल त्या उमेदवारासाठी काम करून , विजयाचा वाटेकरी होणार असेही सी .आर .चव्हाण म्हणाले.

ते प्रवासी संघ कणकवली या सघटनेचे सचिव , भारतीय चर्मकार समाज या सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष , माहिती अधिकार जनजागृती अभियान संस्था – महाराष्ट्र या संस्थेचे प्रदेश सचिव, म्हणूनही सक्रीय आहेत. मानवाधिकार संघटना – अध्यक्ष , ग्राहक पंचायत – संघटक , क्रास्ट्राईब ग्रामसेवक संघटना – सल्लागार या संघटनामध्ये सामाजिक कार्य करतात.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!