कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर कणकवली गड नदी ओव्हर ब्रिजवर टायर लॉक झाल्याने मार्गावरून जाणारा टाटा इंट्रा व्ही ३० क्रमांक (एम एच ०७ एजे २५३१ ) ला अपघात झाला. या अपघातात टेम्पोने मार्गावरून वळण घेत उजव्या बाजूला मार्गावरील रॅलिंग ला धडकून ओरोस च्या दिशेने जाणाऱ्या लेनवर येऊन थांबला.या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र टेम्पोच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. अपघात होताच घटनास्थळी अनेकांनी धाव घेतली.