8.5 C
New York
Tuesday, December 10, 2024

Buy now

नगरोत्थानचा निधी नारायण राणे, निलेश राणेंच्या शिफारशीनुसारच ; विलास कुडाळकर

मविआच्या नागरसेवकांना जनतेचे सोयरसुतक नाही

कुडाळ : खासदार नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार या शहरासाठी विकास निधी आला आहे. याचा कुडाळ नगर पंचायतचे भाजपचे गटनेते विलास कुडाळकर यांनी पुनरुच्चार केला आहे. नगरोत्थानचा निधी कसा आला? कोणी आणला? हे सर्वांना माहित आहे. हे सगळं काही ठेकेदारीसाठी सुरू आहे. कुडाळच्या जनतेचे महाविकास आघाडीच्या नगरसेवकांना काहीच सोयरसुतक नाही, असा आरोप ही त्यांनी केला आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे. त्यात असे म्हटले आहे की, नगरपंचायतीला जो निधी नगरोत्थांनमधून येतो तो निधी नियोजन जवळ येतो आणि हा निधी कोणत्या नगरपंचायतीला किती द्यावा याचे अधिकार नियोजनचे अध्यक्ष तथा पालकमंत्री ठरवत असतात. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कुडाळ नगरपंचायतीवर कोणताही अन्याय केलेला नाही. सत्ताधारी असो किंवा विरोधक त्यांना समान न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. पण यामध्ये खासदार नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार या शहरासाठी विकास निधी आला आहे. आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ नगरपंचायतीच्या क्षेत्रामध्ये गेल्या दहा वर्षांमध्ये किती निधी आणला आणि खर्च केला याचा तपशील महाविकास आघाडीने द्यावा. कोणत्याही प्रकारची माहिती न घेता आमदारांचे गोडवे गाणे बंद करावे. कुडाळ शहरांमध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार नारायण राणे यांना मिळालेले मताधिक्य हे येणाऱ्या विधानसभेचे धोतक आहे.

कुडाळ नगरपंचायतीमध्ये महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यापासून किती अपहार बाहेर आले हे जनतेला माहिती आहे. शहराच्या विकासाला लगाम लावण्याचे काम महाविकास आघाडीने केले आहे. आपल्या सग्यासोयऱ्यांना कामाचे ठेके देणे एवढेच काम केले आहे. आपल्या घरच्यांना ठेके कसे मिळतील आणि आपले घर कसे भरेल हे पाहणाऱ्यांनी शहराच्या विकासाच्या गोष्टी करू नये कुडाळ नगरपंचायतीचा वापर आपले कुटुंब चालवण्यासाठी करणारे महाविकास आघाडीतील अनेक नगरसेवक आहेत हे सर्वांना ज्ञात आहे. आमदार वैभव नाईक यांनी शहरासाठी कोणतेही भरीव काम केलेले नाही आणि जे काम त्यांनी केले आहे असे सांगितले जाते त्यामध्ये कुठेही लोकहित पाहिलेले नाही उदाहरण पाहता कुडाळ शहरातील एस. टी. बस स्थानक, कै. मच्छिंद्र कांबळी नाट्यगृह या सगळ्या वास्तू फक्त ठेकेदारीसाठी घेतलेले निर्णय आहेत. सत्ता असताना आमदार वैभव नाईक यांनी ग्रामीण रुग्णालय किंवा महिला रुग्णालय येथे एक तरी डॉक्टर आणला का? साधा एक्स-रे टेक्निशियन आणायला आमदारांना जमला नाही. पण सत्ता गेल्यावर ग्रामीण रुग्णालय असो किंवा महिला रुग्णालयांमध्ये गैरसोयी दाखवणारी पिलावळ ओरडायला सुरुवात झाली.

शहरातील छोट्या व्यापाऱ्यांना हटविण्याचे काम तसेच गावठी बाजार बंद करण्याचा प्रयत्न हा आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून त्यांच्याजवळ असलेल्या पिलावळी करत आहेत कुडाळ शहराच्या घनकचऱ्यासाठी आमच्या भाजप नगरसेवकांनी सुद्धा सहकार्य केले आहे नगराध्यक्ष अक्षता खटावकर, उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची जनता दरबारात भेट घेतल्यावर एमआयडीसीचे अधिकारी, मुख्याधिकारी यांना दिलेल्या सूचनानुसार सत्ताधाऱ्यांनी का कार्यवाही केली नाही? घनकचऱ्यासाठी भाजपच्या नगरसेवकांनी कोणत्याही प्रकारचा विरोध केला नाही. उलट सहकार्य केले आहे. पण या सत्ताधाऱ्यांना नगरपंचायतीचे प्रशासन जुमानत नाही. त्यामुळे त्यांच्या हातून काही घडत नाही. यावर्षी गणेश विसर्जनावेळी गणेश घाटाकडे जाणाऱ्या गणेश भक्तांचे काय हाल झाले हे सर्वांना माहीत आहे. यावर कोणतीही कार्यवाही केली नाही आता या ठिकाणी गणेश घाट बांधण्यात येणार आहे. हा निधी महायुतीने दिला आहे. तसेच पर्यटन निधीमधील भक्त निवास हे सुद्धा महायुतीने दिलेला निधी आहे.

जर या निधीसाठी आमदार वैभव नाईक यांनी प्रयत्न केले आहेत असे म्हणत असाल तर त्याचे पुरावे द्या. हा निधी कसा आला कोणी आणला हे सर्वांना माहित आहे. हे सगळं काही ठेकेदारीसाठी सुरू आहे. कुडाळच्या जनतेचे यांना काही सोयरसुतक नाही फक्त आरोप करणे आणि आपल्या केलेल्या कर्मांवर चादर पांघरणे एवढेच सत्ताधाऱ्यांचे काम आहे.असे श्री. कुडाळकर यांनी शेवटी म्हटले आहे

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!