सावंतवाडी : तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या जन आशीर्वाद यात्रेच्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांचा जमावबंदीचा आदेश असतानादेखील बांदा कट्टा कॉर्नर येथे मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या संशयितांची सावंतवाडी येथील न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे महेश धुरी, मंदार कल्याणकर, गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्वर सावंत, प्रमोद कामत, अक्रम खान, जावेद खतीब, शीतल राऊळ, उमेश पेडणेकर, विकास केरकर, मधुकर देसाई, प्रवीण देसाई यांसह २५ ते ३० जणांविरोधात मनाई आदेशाचा भंगप्रकरणी गुन्हा दाखल होता.