दोडामार्ग येथील घटना ; गुन्हा दाखल
दोडामार्ग : धाटवाडी येथे राहाणाऱ्या गुणवंती तुकाराम साळकर वय वर्षे ८० ही घरात असताना आरोपी जावई मनेश मधुसूदन नाईक वय वर्षे ४१ रा मळेवाड सावंतवाडी सध्या राहाणार दोडामार्ग भोसले कॉलनी हा रात्रीच्या वेळी सासू गुणवंती साळकर हिच्या घरी जबरदस्तीने घुसून पैशाची मागणी केली. रोजच पैशासाठी तगादा लावत असल्याने सासूने पैसे देण्यास नकार दिला. या रागाने शिवीगाळ मारहाण केली तसेच मारण्याची धमकी दिली. या बाबत गुणवंती साळकर हिने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी मनेश मधुसूदन नाईक वर गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती दोडामार्ग पोलीस निरीक्षक निसर्ग यांनी दिली. ओतारी
दोडामार्ग पोलीस ठाणे येथे दखलपात्र गुन्हा रजिस्टर नंबर 105/2024 BNS कलम 331(3), 115(2), 352,351 (2) (3) नुसार गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १४ आक्टोबर रोजी रात्री घडली. संशयित आरोपी याने या अगोदर गुणवंती साळकर हिच्या मुलीला देखील त्रास देण्याचा प्रयत्न अनेक वेळा केला. होता.