10.5 C
New York
Friday, November 8, 2024

Buy now

माजी आ.परशुराम उपरकर यांच्यावर टीका करणाऱ्यांनी स्वतःच्या पक्षात किती कार्यकर्ते आहेत याची चाचपणी करावी

सामाजिक कार्यकर्ते सचिन मयेकर यांचा ओरोस शिंदेगटाचे विभागीय संघटक संतोष परब यांच्यावर हल्लाबोल

श्री. उपरकर यांच्यावर टीका कराल तर तुम्हाला उघडे पाडू असा दिला इशारा

सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यावर टीका करणाऱ्यांनी अगोदर स्वतःच्या पक्षात किती कार्यकर्ते आहेत याची चाचपणी करावी. माजी आमदार परशुराम उपरकर यांचा जनसंपर्क मोठा आहे. त्यांनी प्रेमाने माणस जोडली आहेत. त्यांची राजकीय कारकिर्द मोठी असून ती काहींच्या नजरेत खुपत आहे. त्यामुळेच शिवसेना मिंधे गटाच्या चिंधी पदाधिकाऱ्यांकडून टीका करण्याचे प्रकार सुरु आहेत, असा पलटवार माजी आमदार परशुराम उपरकर समर्थक व सामाजिक कार्यकर्ते सचिन मयेकर यांनी ओरोस शिंदे गटाचे विभागीय संघटक संतोष परब यांच्यावर प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

पुढे त्यांनी म्हटले आहे की, शिवसेना शिंदे गटाचे ओरोस विभागीय अध्यक्ष संतोष परब यांनी उपरकर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणत टीका केली होती. यावर श्री. मयेकर यांनी त्यांचा खरफुस समाचार घेतला. श्री. उपरकर हे कोणत्याही पक्षात नसताना त्यांची असलेली ताकद पाहून सत्ताधिकाऱ्यांची गद्दारांची जळफळाट दिसून येत आहे. माजी आमदार परशुराम उपरकरांची राजकीय उंची व कारकीर्द मोठी आहे. जिल्ह्यात त्यांची असलेली ताकद, प्रशासकीय अनुभव, यामुळे त्यांचा प्रत्येक कार्यकर्ता प्रेमाने जोडला गेला आहे. कार्यकर्त्याला सन्मान देणे, त्यांच्यावर प्रेम करणे, अडीअडचणीला धावून जाणे हा माजी आमदार परशुराम उपरकर यांचा स्वभाव आहे. त्यामुळेच त्यांच्याकडे कोणताही पक्ष जरी नसला तरी कार्यकर्त्यांचे भरपूर आशीर्वाद, प्रेम, पाठबळ आहे. त्यामुळे कोणीही त्यांच्या कार्यकर्त्यांची काळजी करू नये. जे मिंधे गटाचे पदाधिकारी माजी आमदार परशुराम उपरकरांवर बोलत आहेत त्यांना काही कारणास्तव ऊबाठा ठाकरे सेनेतून हाकलून घातले होते. त्यानंतर त्यांनी मिंधे शिवसेनेत प्रवेश केला. ज्याना स्वतःच्या पक्षात किंमत नाही, अशानी माजीआमदार परशुराम उपरकर यांच्यावर बोलणे हास्यास्पद आहे. त्यामुळे असे प्रकार खपवून घेणार नाही, असा इशारा ओरोस सामाजिक कार्यकर्ते तथा माजी आमदार परशुराम उपरकर समर्थक सचिन मयेकर यांनी दिला.

माजी आमदार परशुराम उपरकरांची जिल्ह्यात असलेली ताकद त्यांनी स्वतः पक्षातून बाहेर पडल्यानंतर निर्धार मेळाव्यातून दाखवून दिली आहे. त्यामुळे जर ते कोणत्याही पक्षात नसले तरी श्री. उपरकर यांची ताकद व त्यांच्या कार्यकर्त्यांची दखल तुम्हाला घ्यावी लागली. यातच सर्व काही आले, अशी बोचरी टीका श्री. मयेकर यांनी केली. श्री. उपरकर यांच्यासोबत अनेक प्रामाणिक कार्यकर्ते आहेत व जे कोणत्याही स्वार्थासाठी किंवा चिरीमिरीसाठी काम करत नसून त्यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेच्या सेवेसाठी कित्येक कार्यकर्ते आजही काम करत आहेत. गावोगावी फिरून असलेले भ्रष्टाचार व जनतेकडून मांडले गेलेले प्रश्न, याबाबत जनतेत समाधान व्यक्त होत आहे. ते जिवाची पर्वा न करता, कोणतीही तमा न बाळगता वेळोवेळी जनतेचे प्रश्न असो, आरोग्याचे प्रश्न असो व इतर कोणतेही शासकीय विषय असो ते सतत जनतेसाठी आवाज उठवत असतात. सत्ताधारी पक्षातील पदाधिकारी देखील हे मान्य करत आहेत. त्यामुळे आमच्या भानगडीत तुम्ही पडू नका अन्यथा तुम्हाला उघडे करू, असा इशारा श्री. मयेकर यांनी दिला.

कोणत्याही पक्षात नसताना किंवा फक्त स्वतःच्या हिमतीवर माजी आमदार परशुराम उपरकर हे नेहमीच भ्रष्टाचारा विरोधात बोलतात, तुमच्यात हिंमत असेल तर अन्याय विरोधात लढण्याची हिंमत दाखवा, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते तथा माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर समर्थक सचिन मयेकर यांनी दिला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!