24.5 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

कणकवलीत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला | मुख्याधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी

कणकवली : कणकवली शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव सध्या वाढला आहे. गेली काही दिवस भटक्या कुत्र्यांनी शहरवासीय त्रस्त झाले असतानाच आज कणकवली टेंबवाडी परिसरात म्हशीच्या रेडकू वर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करत अक्षरशा त्याचा कोथळा बाहेर काढला आहे. जिवंत रेडकावर केलेल्या हल्ल्यात अक्षरशा टेंबवाडी परिसरात हे रेडकू विव्हळत होते. भटक्या कुत्र्यांनी या रेडका वर केलेल्या हल्ल्यामुळे कणकवली शहरातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव पुन्हा एकदा समोर आला आहे. कणकवली नगरपंचायत चे मुख्याधिकारी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहतील काय असा सवाल कणकवली शहरवासीयांमधून उपस्थित केला जात आहे. दरम्यान या रेडकाचे कुत्र्यानी लचके तोडले असून याबाबत कणकवली नगरपंचायत कडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. कणकवली नगरपंचायतीवर गेले दीड वर्ष प्रशासकीय राजवट आहे. तत्पूर्वी नगरपंचायत सत्ताधिकाऱ्यांकडून भटक्या कुत्र्यांची नसबंदी केली जात होती. मात्र गेली दीड वर्षे या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला जात नसल्याने त्यांचा उपद्रव वाढला आहे. शहरातील मच्छी मार्केट ते बांधकरवाडी यादरम्यान भटक्या कुत्र्यांचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. तर टेम्बवाडी, कांबळे गल्ली या परिसरातही भटके कुत्री लहान मुले तसेच जनावरांच्या अंगावर धावून जात आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!