17.9 C
New York
Saturday, May 18, 2024

Buy now

अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली येथे व्हच्युओसीक उदघाटन सोहळा संपन्न

कणकवली | मयुर ठाकूर : सन २०१२ पासून सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नितेश राणे यांच्या संकल्पनेतुन सुरु झालेल्या ” व्हच्युओसीक” या कोकणातील सर्वात मोठया टेक्निकल फेस्टीव्हलचा उदघाटन सोहळा दिनांक ५ एप्रिल २०२४ रोजी, डॉ. राजीन लिनस, असोसीएट प्रोफेसर आणी विभाग प्रमुख, संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापुर, यांच्या शुभहस्ते दिमाखात संपन्न झाला. या प्ररसंगी डॉ. अक्षय भोसले, संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापुर, डॉ. मिथुन अंश, इलेक्ट्रिकल विभाग, छ. शाहु कॉलेज ऑफ इंजिनीअरींग, संभाजी नगर, महाविद्यालयाचे प्र प्राचार्य डॉ. महेश साटम व प्रशासकीय अधिकारी शांतेश रावराणे सर्व विभाग प्रमुख, शिक्षक वर्ग, महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी प्रतिनीधी व विद्यार्थी उपस्थित होते. उदघाटन प्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश साटम म्हणाले की भारतात आपण आपला आनंद सणांच्या माध्यमातुन साजरा करतो त्याच प्रमाणे टेक्निकल क्षेत्रातील विवीध गोष्टी एकाच व्यासपीठावर आपण एखादया सणा प्रमाणे साज-या करतो तो सण म्हणजे हे टेक्निकल फेस्टीव्हल “व्हच्युओसीक २०२४” उदघाटन सोहळ्याचे प्रमुख अतिथी डॉ. राजीन लिनस, असोसीएट प्रोफेसर आणी विभाग प्रमुख, संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापुर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला देताना म्हणाले की स्वतःचा आनंद महत्वाचा आहे, प्रत्येक गोष्ट ही स्वतःच्या आनंदासाठी करा पण महत्वाच काय आहे की आपण आपल्या आनंदासाठी काम करत असताना त्याचा त्रास जर का दुस-याला झाला तर त्या आनंदाला काहीही किंमत राहत नाही. काम असे करा की त्याचा इतरांना त्रास होणार नाही व आपल्याला पण आनंद मिळेल. ध्येय ठरवा आणी ध्येयाकडेच जाणारा रस्ता पकडा, यश तुमचच आहे.

या टेक्निकल फेस्टीव्हल मध्ये इव्होल्युशन २०२४ ही शोधनिबंध स्पर्धा, डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रोजेक्ट एक्झीबीशन स्पर्धा व प्रश्नमंजुषा स्पर्धा, पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा, रोबोटीक्स, रोबोसॉकर स्पर्धा, मॉक टेस्ट, इयत्ता ८ वी, ९ वी, १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शन स्पर्धा, डिबेट स्पर्धा, लॅन गेमींग, इंजिनीअरींग डिग्री विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट एक्झीबीशन, डॉक्युमेंट्री स्पर्धा डिरेक्टो यासह अनेक लहान-मोठया स्पर्धांचे आयोजन केले आहे. यात महाराष्ट्र व गोवा व कर्नाटक राज्यातील इंजिनीअरींगचे शिक्षण घेत असलेले विद्यार्थी त्याच बरोबर सिंधुदुर्ग जिल्हयातील इयत्ता ८ वी, ९ वी, १० वी चे विद्यार्थी यांनी उत्फुर्तपणे सहभागी झाले आहेत. प्र. प्राचार्य डॉ. महेश साटम व प्रशासकीय अधिकारी श्री. शांतेश रावराणे यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजक म्हणून महाविद्यालयाच्या इलेक्ट्रीकल विभागाचे प्राध्यापक श्री. इम्रान पटेल व कॉम्पुटर सायन्स इंजिनिअरींग (ए आय एम एल) विभागाचे प्राध्यापक. तुषार मालपेकर हे काम पाहत आहेत. “व्हच्युओसीक २०२४” या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी बक्षीस व ज्ञान मिळवीण्यासाठी प्रयत्न करावेत अशा शुभेच्छा संस्थेच्या अध्यक्षा निलमताई राणे, उपाध्यक्ष डॉ. निलेश राणे व ज्यांच्या संकल्पनेतुन या कार्यक्रमाची मुहुर्तमेढ रोवली गेली असे सचिव सन्मा. नितेशजी राणे यांनी दिल्या आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!