13.3 C
New York
Monday, May 20, 2024

Buy now

व्यवसायिक वादातून कामगाराला मारहाण | पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मालवण | प्रतिनिधी : व्यावसायिक वादातून एका कामगाराला तो राहात असलेल्या अन्य तालुक्यातून घेऊन जात नग्न करून मारहाण केल्याची घटना चौके येथे घडली. त्या कामगाराला नग्न केल्यानंतर त्याचे व्हिडिओ त्याच्याच मोबाईल मध्ये मारहाणकर्त्यांनी काढले. पीडित कामगाराने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मारहाणीच्या घटनेनंतर त्या ठिकाणाहुन संबंधित पीडित कामगारांची सुटका झाल्यावर त्याने आपल्या पत्नीला या घटनेची माहिती दिली. तसेच येथील पोलीस ठाण्यात पीडित कामगाराने तक्रार दिली. त्यानुसार चौके येथील विनोद सांडव, प्रतीक शिंदे यांसह अन्य जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली. चौके येथील विनोद सांडव यांच्या गाडीवर संबंधित कामगार कामाला होता. गाडी त्याच्या ताब्यात होती. मात्र गेले काही महिने कामगार फोन उचलत नाही. कोणताही हिशोब देत नव्हता. या प्रकारातून तो कामगार राहात असलेल्या अन्य तालुक्यातील गावातून त्याला उचलून आणून चौके येथे डांबून ठेवण्यात आले. त्याला नग्न करून मारहाण करण्यात आली. त्याच्याच मोबाईल मध्ये त्याचे व्हिडिओ करण्यात आले. पिडीत कामगाराने दिलेल्या तक्रारीनुसार चौके येथील विनोद सांडव, प्रतीक शिंदे यांसह अन्य जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच विनोद सांडव यांनीही संबंधीत कामगार आपल्याला धमकी देत असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे. कामगाराला नग्न करून मारहाण झाली हा गंभीर प्रकार आहे. तसेच त्या कामगाराला ज्या तालुक्यातील गावातून उचलून आणले. हे अपहरण आहे. त्या गावच्या हद्दीतील पोलीस ठाण्यातही याबाबत संबंधित आरोपी विरोधात गुन्हा दाखल व्हावा. अशी मागणी पीडित कामगाराच्या मित्र परिवाराकडून केली जात आहे. पोलीस प्रशासनाने याची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!