7.6 C
New York
Monday, November 4, 2024

Buy now

कणकवली शहरात पाय ठेवल्यावर स्मार्ट कणकवली पहायला मिळणार – आ. नितेश राणे

कणकवली गणपती साना येथील धबधब्याचे आ. नितेश राणेंच्या शुभहस्ते उद्घाटन

कणकवली | मयुर ठाकूर : कणकवली शहराचा चेहेरा मोहरा बदलण्याचा शब्द खा. नारायण राणे यांनी दिला होता. कणकवली वासीयांना जे जे शब्द दिले होते. त्या सर्व गोष्टी आणि प्रकल्प शब्दांपलीकडे जाऊन कृतीतून आम्ही करून दाखले आहेत. यासाठी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे व सर्व सहकाऱ्यांनी जो शब्द दिलेला कणकवली शहरात पर्यटन वाढवण्यासाठी व शहरातील लोकांना आकर्षण म्हणून चांगला प्रकल्प याठिकाणी उभारू त्याच बारामहिने वाहणाऱ्या धबधब्याचे उद्घाटन आज झालेलं आहे. कणकवली शहर वासीयांना दिलेले सर्व शब्द आमही पूर्ण केलेले आहेत.

ज्यांनी ज्यांनी कणकवली चे नेतृत्व केलं त्यांनी कणकवलीसाठी काय केलं ? आम्ही गेल्या पाच वर्षात स्पोर्ट कॉम्प्लेक्स, पोदार इंटरनॅशनल स्कुल, बारामहिने वाहणारा धबधबा, रस्त्यांचे जाळे असे अनेक विषय कणकवली शहरात पाय ठेवल्यावर स्मार्ट कणकवली पहायला मिळते. याच सर्व श्रेय नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सर्व सहकारी यांच आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे देखील मोठे सहकार्य मिळाले. महायुतीचे सरकार आल्यानंतर कणकवली शहराला भरघोस निधीच्या माध्यमातून जे झुकत माप दिलं गेलं त्यामुळे हे सर्व प्रकल्प होत आहेत.

यावेळी आमदार नितेश राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे आभार मानले.

येथील बारमाही वाहणाऱ्या धबधब्याचे लोकार्पण कणकवली विधानसभा मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी नगरसेवक किशोर राणे , शहराध्यक्ष अण्णा कोदे, संजय कामतेकर, विराज भोसले, मेघा सावंत, अनिल पवार, महेश सावंत, बंडू गांगण, शिशिर परुळेकर, महेश सावंत, विशाल कामत, गौतम खुडकर, संजना सदडेकर, चारू साटम, प्रतीक्षा सावंत, प्रशांत सावंत, ठेकेदार अनिस नाईक, नगरपंचायत प्रशासकीय अधिकारी अमोल आघम, प्रशांत राणे, रविंद्र म्हाडेश्वर, निवृत्त कर्मचारी किशोर धुमाळे आदि उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!