8.5 C
New York
Tuesday, December 10, 2024

Buy now

मसुरे येथे आमदार वैभव नाईक यांच्या निधीतून साकारलेल्या सभामंडपाचे लोकार्पण….

मसुरे प्रतिनिधी : मसुरे येथे आमदार वैभव नाईक यांच्या सुमारे दहा लाख रुपये आमदार निधीतून साकारलेल्या येथील श्रीदेवी पावानाई मंदिर च्या सभा मंडपाचा लोकार्पण सोहळा आमदार वैभव नाईक यांच्या शुभहस्ते नुकताच मसुरे येथे करण्यात आला. येथील भाविक भक्तांची आणि पावसाळ्यात दसरा उत्सवात होणारी गैरसोय या मुळे दूर होणार आहे. सभामंडपाचे काम पूर्ण झाल्यामुळे येथील भाविक भक्त, ग्रामस्थ, पावणाई मंदिर ट्रस्टचे सदस्य यांनी आमदार वैभव नाईक यांचे आभार व्यक्त केले आहे.

मसुरे येथे श्री पावाणाई देवी मंदिर सभा मंडपाचे लोकार्पण करताना आमदार वैभव नाईक सोबत संग्राम प्रभू गावकर, मधुकर प्रभूगावकर, हरी खोबरेकर आणि मान्यवर…

यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणालेत मसुरे गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपले नेहमीच सहकार्य लाभले आहे आणि यापुढे सुद्धा गावच्या सर्व विकासात्मक प्रश्नांबाबत आपण नेहमीच पाठीशी राहणार आहोत. येथील धूपप्रतिक बंधारा, रमाई नदीचा गाळ, रस्त्यांचा प्रश्न,नदीवरील पूल, विविध सभा मंडप, वैयक्तिक लाभार्थी योजना असे अनेक प्रश्न पूर्णत्वास गेले असून उर्वरित प्रश्न सुद्धा टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येतील. यापुढेही आजपर्यंत तुम्ही जसं माझ्यावरती प्रेम केलात तसं प्रेम येणाऱ्या काळातही तुम्ही माझ्यावर करावे अशी विनंती या वेळी केली.

यावेळी बोलताना संग्राम प्रभू गावकर म्हणालेत या सभामंडपाची अतिशय गरज या ठिकाणी होती आणि आमदार वैभव नाईक यांनी ही गरज ओळखून हे काम पूर्ण करण्यासाठी दिलेला शब्द लगेच पूर्ण करून त्यांनी जी कार्य तत्परता दाखवलेली आहे ही कौतुकास्पद आहे यासाठी येथील ग्रामस्थ येथील ट्रस्ट आणि गावाच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो. उभाठा शिवसेनेच्या माध्यमातून येथे विकास झालेला असून भविष्यात सुद्धा उर्वरित विकास कामे पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. यावेळी तालुकाध्यक्ष हरि खोबरेकर, मसुरे देवस्थान प्रमुख मधुकर प्रभूगावकर आणि मान्यवरांनी विचार व्यक्त केले. आमदार वैभव नाईक यांचा मसुरे देवस्थान प्रमुख मधुकर प्रभूगावकर, संग्राम प्रभूगावकर आणि ट्रस्टचे सदस्य मानकरी यांच्यावतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन हृदय सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मर्डे गावचे माजी सरपंच संदीप हडकर आणि प्रास्ताविक पूनम चव्हाण यांनी केले.यावेळी उभाठा शिवसेना मालवण तालुकाध्यक्ष हरी खोबरेकर, माजी जि प अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, मसुरे देवस्थान प्रमुख मधुकर प्रभू गावकर, माजी सरपंच संदीप हडकर अशोक बागवे, माजी उपसरपंच राजेश गावकर, महेश बागवे, देऊळवाडा माजी सरपंच श्रीमती वायंगणकर मॅडम, पप्पू मुळीक, अनिल खोत, किसन दुखंडे,आशिष परब,भानुदास परब,अनिल सावंत, माजी ग्रा.प. सदस्य राजू सावंत,सुहास पेडणेकर, नरेंद्र सावंत,मामी पेडणेकर, माया मुणगेकर, मुंबई येथील शिवसेनेच्या महिला शाखा संघटक ममता मसुरेकर मॅडम, अनिल दुखंडे,दिनकर दुखंडे, आलम शेख,बापू मसूरेकर, पांडुरंग येसजी,राजू मालवणकर,श्रीमती बिलये मॅडम, प्रवीण खोत, नरेंद्र हिंदळेकर,

आणि ग्रामस्थ, मंदिर ट्रस्ट सदस्य,दुखंडे परिवार, उभाठा शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार वैभव नाईक यांचा मंदिर ट्रस्ट आणि मसुरे गावातील देवस्थान मानकरी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. मसुरे देवस्थान प्रमुख मधुकर प्रभू गावकर यांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते हृदय सत्कार करण्यात आला…

 

 

 

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!