8.5 C
New York
Tuesday, December 10, 2024

Buy now

सतीश सावंत लाइफबॉय साबण आणलाय एकत्रित आंघोळीसाठी तारीख व वेळ जाहीर करा!

गणपती सान्याकडील धबधब्याच्या लोकार्पणप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांचे आव्हान

धबधब्याचे काम होणार नाही असा केला होता सतीश सावंत व विरोधकांनी दावा

कणकवली : नगरपंचायत मध्ये आम्ही सत्तेत असताना वेळीच ह्या धबधब्याचे काम करण्याचा आश्वासन दिलं होतं. तशी घोषणा देखील केली होती. मात्र त्यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे सतीश सावंत अतुल रावराणे व पारकर यांनी धबधब्याचं आश्वासन खोटे आहे. हा धबधबा होणारच नाही असे वक्तव्य करत दिशाभूल केली होती. मात्र त्यावेळी त्यांच्या आरोपांना पत्रकार परिषद घेत आम्ही उत्तर दिलं होतं व आम्ही त्यावेळी जाहीर रित्या सांगितलं होतं की हा धबधबा होणार व गणपती साना येथेच होणार. व या धबधब्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या धबधब्याच्या खाली मी सतीश सावंत हे याच लाईफबॉय साबणाने आंघोळ करणार असे सांगत कणकवली चे माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी या उद्घाटनाप्रसंगी खिशातून आणलेला लाईफबॉय साबण देखील काढून दाखवला. सतीश सावंत यांनी वेळ जाहीर करावा मी साबण घेऊन तयार आहे असा टोला बंडू हर्णे यांनी लगावला. यावेळी उपस्थितांमधून एकच हसा पिकला. कणकवली गणपती सणा येथील कृत्रिम धबधब्याच्या लोकार्पण प्रसंगी श्री हरणे बोलत होते यावेळी त्यांच्यासोबत आमदार नितेश राणे यांच्यासह माजी नगराध्यक्ष समीर नलावडे देखील उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!