18.9 C
New York
Wednesday, April 30, 2025

Buy now

भारतीय जनता पार्टीच्या वतीने दुर्गामातेची प्रतिष्ठापना

कणकवली : तालुका भारतीय जनता पार्टी सार्वजनिक नवरात्रोत्सव दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील साजरा केला जात आहे. गुरुवारी घटस्थापनेदिवशी कणकवली बाजारपेठेतून ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या अतिषबाजीत दुर्गामातेची आगमन मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुरुवारी दुर्गामातेची प्रतिष्ठापणा मोठ्या उत्साहात करण्यात आली. दरम्यान दुर्गामातेच्या प्रथम पूजेचा मान भाजपचे कार्यकर्ते तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष चव्हाण यांना मिळाला.

यावेळी माजी जि. प.अध्यक्ष संदेश सावंत, माजी जि. प. अध्यक्षा संजना सावंत, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, जिल्हा बँक संचालक विठ्ठल दळवी, जिल्हा बँक संचालक प्रज्ञा ढवण, कलमठ उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, संजना सदडेकर भाजपा तालुका उपाध्यक्षा कणकवली, प्रकाश सावंत, जिल्हा चिटणीस भाजपा युवा मोर्चाचे गणेश तळगावकर, शहराध्यक्ष अण्णा कोदे, राजन परब, प्रज्वल वर्दम आदि उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!