टोळीकडून ३,७८,१०० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व मोबाईल पोलिसांनी केला जप्त
कोल्हापूर दि.३ | यश रुकडीकर : दुपारी १ वाजताच्या सुमारास शिवाजी पुतळा येथे बसमधून खाली उतरताना अज्ञाताने पिशवीतील पर्स चोरी केल्याचे लक्षात येताच सोनाली दिलीप नरके यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली होती.ह्या चोरीचा तपास करताना गर्दीचा फायदा घेत चोरी करणारी महिलांची टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या हाती लागली.त्यांच्याकडून ३,७८,१०० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने,रोखरक्कम व मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे.
दिनांक ३०/०९/२०२४रोजी झालेल्या ह्या चोरीचा गांभीर्याने तपास करत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला खात्रीशीर माहिती मिळाली की ही चोरी कागल व राजेंद्र नगर येथील महिलांनी केली आहे.सदर महिलांना आज दि.३ रोजी पथकाने अटक केली.गुन्हा केलेल्या या महिलांची नावे १)माधवी विकास लोंढे,वय ३०,२) अनिता सुहास लोंढे,वय ४० दोघी राहणार शाहूनगर बेघरवसाहत,कागल,३)रेखा विजय सकट ,वय ५५, रा. वडरगे रोड,गडहिंग्लज,४) रूपा संतोष घोलप,वय ४५, रा.राजेंद्र नगर,कोल्हापूर,५)मंदा संतोष लोंढे,वय ४०, रा.स्वातंत्र्य सैनिक वसाहत,राजेंद्र नगर, कोल्हापूर,६)आरती हरी चौगुले,वय २४, रा.बुद्धनगर ,निपाणी,बेळगाव.
अशी आहेत.पोलिसांनी गुन्ह्याची चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले.त्यांच्याकडून ३२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र,२० ग्रॅम वजनाचा सोन्याचा लक्ष्मीहार,८ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या असे एकूण ६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने,विवो कंपनीचा मोबाईल व रोख रक्कम असा एकूण ३,७८,१०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पुढील तपास लक्ष्मीपुरी पोलीस करत आहेत.
सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, अंमलदार सुरेश पाटील, राम कोळी,विनोद कांबळे,अमित सर्जे,युवराज पाटील,रोहित मर्दाने,रुपेश माने,कृष्णात पिंगळे, हंबिर अतिग्रे,राजेंद्र वरांडेकर,सुशील पाटील तसेच एएचटीयूच्या महिला अंमलदार धनश्री पाटील व तृप्ती सोरटे यांनी केली.