“तो येतोय घराणे शाही नष्ट करण्यासाठी’ लागलेला बॅनर ठरतोय चर्चेचा विषय
कणकवली : विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. कणकवली – देवगड – वैभववाडी मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सध्याचे विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे प्रतिस्पर्धी नेमका उमेदवार कोण यांची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागून राहिलेली असताना. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी वेंगुर्ले पाठोपाठ कणकवली शहरात देखील छत्रपती शिवाजी महाराज चौकासह इतर ठिकणी बॅनर लागले होते. यावर “मी येतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घराणेशाही नष्ट करण्यासाठी” अशा आशयाचा मजकूर असलेला आणि त्यावर मशाल चिन्ह वापरलेले आहे. त्यामुळे नक्की हा बॅनर कोणी ? आणि कोणाला इशारा देण्यासाठी लावला ? असा सवाल देखील उपस्थित होत आहे.एकंदरीतच सदरचा बॅनर पोलिसांनी तात्काळ हटविला आहे. तरीही त्या बॅनर ची चर्चा देखील मोठ्या प्रमाणात होत आहे.