कणकवली शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध ; आ. नितेश राणे
कणकवली | मयुर ठाकूर : शहराच्या सौंदर्यकरणात दिवसेंदिवस भर पडत असतानाच आता कणकवली रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या नरडवे रोडच्या सुशोभीकरणात देखील आता भर पडली आहे. कणकवली नगरपंचायतमध्ये सत्ता काळात आमदार नितेश राणे यांच्या विशेष पाठपुराव्यातून प्रस्तावित केलेले स्कल्पचर बसविण्याचे काम अखेर पूर्ण झाले. या कामाचा लोकार्पण सोहळा आज कणकवली विधानसभा मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत तसेच जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दादा कुडतरक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून लोकार्पण करण्यात आले.
यावेळी आ. नितेश राणे म्हणाले, कणकवली शहराचा दर्जेदार विकास झाला पाहिजे यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील आहे. त्याचप्रमाणे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे देखील सातत्याने पाठपुरावा करत असतात. आम्ही सातत्याने कणकवली शहराचा दर्जा व विकास कामांसाठी प्रयत्न करत असतो. सुशोभीकरणाच्या दृष्टीने कणकवली शहर अग्रेसर आहे. यासाठी कणकवली नगरपंचायत च्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी प्रशासनाच्या माध्यमातून सुशोभीकरणासाठी निधी मंजूर करून घेतला. त्यामुळे नरडवे मार्गावर संदेश देणारी शिल्पे उभारली गेली. कणकवली शहर अन्य शहरांच्या तुलनेत सुशोभीकरण आणि स्वच्छतेच्या बाबतीत कुठेही कमी पडता नये. या दृष्टीने हे पाऊल उचलले असल्याचे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.
यावेळी आमदार नितेश राणे, मुख्याधिकारी गौरी पाटील, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, भाजपा अनुसूचित जमातीचे जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, माजी नगरसेवक संजय कामतेकर, संदिप नलावडे, किशोर धुमाळे, किशोर राणे आदि उपस्थित होते.