रस्ता डांबरीकरण न झाल्यास येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार ग्रामस्थांचा इशारा !
कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यांतील कळसुली भोगनाथवाडी ते गावकरवाडी जाणाऱ्या रस्त्याची आज गावकरवाडी ग्रामस्थांकडून साफसफाई तसेच रस्त्यावर आलेली खडी बाजूला करुन डागडुजी करण्यात आली. तसेच वारंवार मागणी करूनही सदर रस्ता रहदारीचा असूनही डांबरीकरण केला जात नसल्यामुळे, मोठे मोठे खड्डे रस्त्यावर पडले असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रस्ता डांबरीकरण न झाल्यास येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा गांवकर वाडीतील ग्रामस्थांनी दिला आहे.
यावेळी रस्ता साफसफाई करताना संजय नेरूरकर, स्वप्निल नेरुकर, भाऊ वायंगणकर, अरुण घाडीगावंकर, प्रथम घाडीगावंकर, तुकाराम घाडीगावंकर,ज्ञानदेव घाडीगावंकर, सचिन घाडीगावंकर, किशोर घाडीगावंकर, प्रमोद घाडीगावंकर, मामा मेस्त्री,निलेश घाडीगावंकर, नवसोबा घाडीगावंकर, सुभाष घाडीगावंकर, संतोष घाडीगावंकर, सुरेश घाडीगावंकर, दत्ताराम घाडीगावंकर, समिर वायगंणकर, किशोर घाडीगावंकर, धकू घाडीगावंकर, सत्यविजय वायगंणकर यांनी अंग मेहनतीने रस्त्याची साफसफाई करत रस्ता तूर्तास वाहतुकीस सुरक्षित कऱण्यात आला आहे.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री नंदकिशोर(नंदू)परब देखील उपस्थित होते.