सावंतवाडी शहरात लावण्यात आलेल्या “त्या”बॅनरची चर्चा
दीपक केसरकर यांच्याविरोधात अज्ञाताकडून लावण्यात आलेत बॅनर
सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : सावंतवाडी शहरात मंत्री दीपक केसरकर यांच्याविरोधात अचानकपणे बॅनर झळकल्याने सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. अज्ञाताकडून हे बॅनर लावल्याचे त्यावरील मजकूरावरुन कळते. हे बॅनर मालवणी भाषेत लिहिण्यात आले आहेत. यात केसरकरांनी जनतेची कशी फसवणूक केली हे त्यात लिहिले गेले आहे. हे बॅनर कोणी लावले असावेत याबाबत अद्यापपर्यंत कळू शकले नाही. मात्र, या बॅनरची सावंतवाडी शहरात मात्र सकाळपासून जोरदार चर्चा सुरू आहे.