६ जखमी ; उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात केले दाखल
कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर नडगिवे घाटी येथील देवीच्या मंदिरानजिक समोरासमोर दोन कार मध्ये बुधवारी सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात ६ जण जखमी झाले आहेत. जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मुंबई – गोवा महामार्गावर नडगिवे घाटी मध्ये मुंबई कडून येणारी कार राँग साईटने आली. त्यामुळे दोन कार मध्ये समोरासमोर धडक होवून अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. या अपघातातील जखमींना १०८ रुग्णवाहिकेचे डॉ. अनिरुद्ध मुद्राळे, चालक सचिन परब यांनी उपचारासाठी रुग्णवाहिकेतून कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केलं आहे. स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.