10.6 C
New York
Monday, October 14, 2024

Buy now

नयना भोजने कांबळी यांचा वैद्यकीय सेवेतील कार्याचा गौरव…

नयना भोजने कांबळी मसुरे येथे औषध निर्माण अधिकारी पदावर कार्यरत..

मसुरे प्रतिनिधी : मसुरे प्राथमिक आरोग्य केंद्र येथील औषध निर्माण अधिकारी श्रीमती नयना रुपेश भोजने कांबळी यांचा महाराष्ट्र राज्य औषध निर्माण अधिकारी संघटना शाखा सिंधुदुर्ग यांच्यावतीने जिल्हा परिषद आरोग्य विभागातील उत्कृष्ट कामाबद्दल मान्यवरांच्या हस्ते कुडाळ येथे गौरव करण्यात आला. या प्रसंगी त्यांना शाल श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य औषध निर्माण अधिकारी संघटना शाखा सिंधुदुर्गचे मधुकर पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी श्रीमती सई धुरी, आर एस करतसकर, रिजवान पिंपरी, बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नयना भोजने कांबळी यांचा गौरव करण्यात आला.

मसुरे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कार्यरत असणाऱ्या नयना भोजने कांबळे या आतापर्यंत रुग्णांना अतिशय चांगली सेवा देत आहेत. चौके प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सुद्धा रुग्णांना चांगली सेवा देत आहेत. मसुरे आणि चौके आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांच्या अडीअडचणीच्या प्रसंगी सुद्धा त्यांच्या मागे त्या खंबीरपणे उभ्या असतात यामुळे रुग्णांमध्ये त्या लोकप्रिय आहेत.

आरोग्य विभागात चांगली सेवा बजावल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल महाराष्ट्र राज्य औषध निर्माण संघटना शाखा सिंधुदुर्ग यांनी घेऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल मसुरे, चौके गावातून तसेच मसुरे, चौके, प्राथमिक आरोग्य केंद्र चे सर्व कर्मचारी वर्ग तसेच मसुरे वैद्यकीय अधिकारी आणि सर्व कमाचाती, चौके प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी आणि सर्व कर्मचारी, तालुका वैद्यकीय अधिकारी मालवण आणि सर्व कर्मचारी,

माजी जि. प. अध्यक्षा सरोज परब, माजी पंचायत समिती सदस्य गायत्री ठाकूर, माजी उपसभापती छोटू ठाकूर, मसरे माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, शिवाजी परब,महेश बागवे,विलास मेस्त्री आणि येथील ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!