अतुल रावराणेंचा घणाघात ; आमदार नितेश राणेंवर खोचक टीका
कणकवली : सत्तेत असताना मागील अडीच वर्षे महाराष्ट्रातील जनतेला फसवलेत म्हणून तुम्हाला आता ठाकरे सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते फोडा आणि भाजपला जोडा असा आदेश भाजपा नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यात घेतलेल्या बैठकीत दिला आहे. राज्यातील जनतेची दिशाभूल केल्यामुळे आणि फसवी आश्वासने दिल्यामुळे आज भाजपाला महाविकास आघाडी चे कार्यकर्ते फोडावे लागतात. अन्य पक्षाचे कार्यकर्ते फोडा म्हणणाऱ्या भाजपा नेत्यांकडून भाजपा कार्यकर्त्यांवर मात्र अविश्वास दाखवला जात आहे.
स्थानिक आमदार नितेश राणे धर्मा धर्मांत तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे. गळ्यात भगवी शाल घालून कोणी कडवा हिंदू होत नाही. जर एवढा मुस्लिम द्वेष असेल तर नितेश राणे यांनी स्वतःच्या घरापासून सुरवात करावी. मुस्लिमांशी व्यवहार करू नका म्हणणाऱ्या नितेश राणेंनी स्वतःच्या घरातल्यांचे मुस्लिमांशी व्यवहार आहेत हे तपासून बघावे. खासदार नारायण राणेंची डायबेटीज ची औषधे मागील 32 वर्षे एका मुस्लिम धर्मीय डॉक्टरकडून घेत आहेत. धर्माच्या नावावर चिथावणीखोर भाषणे करून हिंदू युवकांची माथी भडकवणाऱ्या आमदार नितेश राणेंचा कुठलाच धर्म काही. नितेश राणेंचा केवळ सत्ताधर्म आहे. ज्यांचे सरकार तो नितेश राणेंचा धर्म आहे. नितेश राणे बाटगा हिंदू आहे. कारण हो बाडगा असतो तोच जास्त बडबड करत असतो. हिंदू हा सहिष्णू धर्म आहे. कुठल्याही धर्माचा द्वेष हिंदू धर्म शिकवत नाही. सत्ताधारी पक्षाचे नेते ज्याप्रमाणे राज्यात बैठका घेऊन. ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी एकहाती सिनेट ची निवडणूक जिंकून मिंद्यांचा सुफडा साफ केला. येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचीच सत्ता येणार आहे. राज्याप्रमाणे केंद्रातही बदल होतील असेही अतुल रावराणे म्हणाले.