वेंगुर्ला : स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा‘ हा स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त २४ सप्टेंबर रोजी नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृहात दोन गटात घेण्यात आलेल्या ‘स्वच्छता प्रश्नमंजूषा‘ स्पर्धेत दिशा गावकर व रक्षिता रेडकर तसेच दुर्वा गांवकर व रिशिता बोवलेकर या जोडीने प्रथम क्रमांक पटकाविला.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्याधिकारी परितोष कंकाळ, जिल्हा नियोजन समिती सदस्य दिलीप गिरप, सचिन वालावलकर, वेंगुर्ला हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रमोद कांबळे, मदर तेरेसा स्कूलचे मुख्याध्यापक फेलिक्स लोबो, परिक्षक संतोष पवार, तानाजी चव्हाण, बॅ.नाथ पै सेवांगणचे देवदत्त परूळेकर, प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल, पत्रकार दाजी नाईक, महेंद्र मातोंडकर उपस्थित होते. ही प्रश्नमंजूषा स्वच्छ भारत अभियान, माझी वसुंधरा अभियान, पाठ्यपुस्तकावर आधारीत सामान्य ज्ञान आणि चालु घडामोडी यावर आधारीत होती.
स्पर्धेच्या पाचवी ते सातवी गटामध्ये वेंगुर्ला हायस्कूल, सिधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूल, शाळ क्र. १,२,३ व ४ या प्राथमिक शाळा सहभागी झाल्या होत्या. या गटामध्ये प्रथम-दिशा गांवकर व रक्षिता रेडकर (वेंगुर्ला नं.२), द्वितीय-सई शिरगांवकर व सुयोग समुद्रे (वेंगुर्ला हायस्कूल), तृतीय-निल पवार व वेद वेंगुर्लेकर (वेंगुर्ला नं.१) यांनी पटकाविले.
आठवी ते दहावी गटामध्ये वेंगुर्ला हायस्कूल, सिधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूल, मदर तेरेसा व पाटकर हायस्कूल या शाळा सहभागी झाल्या होत्या. या गटात प्रथम- दुर्वा गांवकर व रिशिता बोवलेकर (पाटकर हायस्कूल), द्वितीय-सिद्धी गावडे व श्रेया मराठे (सिधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूल) यांनी पटकाविले.