निवडणुका आल्या की केसरकर वेगवेगळे उद्योगपती मतदारसंघात आणतात..
सावंतवाडी : केसरकर यांनी अरोंदा येथे बोट हाऊस सुरू करू असे सांगून तब्बल चार वेळा पाहणी केली त्यासाठी खर्च केला तेवढा देखील त्यांनी निधी सुद्धा प्रकल्प त्या ठिकाणी त्यांनी उभारला नाही यावरून केवळ निवडणुका आल्या की लोकांची दिशाभूल करायची आणि त्यानंतर त्यावर पाठ फिरवायची असे एक कलमी कार्यक्रम केसरकर यांनी गेले अनेक वर्षात केलाय अशी टीका रुपेश राऊळ यांनी आज येथे केली.
दरम्यान केसरकारांनी निवडणुका जवळ आल्या की वेगवेगळे उद्योगपती मतदारसंघात आणले त्यात विठ्ठल कामत प्रशांत कामत आणि हर साबळे यांचा समावेश होता. मात्र आता ते उद्योगपतीही नाही आणि उद्योग ही दिसत नाही त्यामुळे केसरकर निवडणुकीच्या तोंडावर लोकांना फसवण्याचा काम करत असल्याने त्याची चौकशी देखील झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.