15.3 C
New York
Saturday, March 22, 2025

Buy now

महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न ; महिला गंभीर

अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविले

मालवण : मालवण बस स्थानकासमोरील के जी डायग्नोस्टिक सेंटर या लॅबमध्ये काम करणाऱ्या प्रीती केळूसकर ( वय सुमारे ३४, रा. धुरीवाडा) या महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी २:४५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या महिलेने अलीकडे दुसरे लग्न केले आहे. या रागातून तिच्या पहिल्या नवऱ्याने हे कृत्य केल्याचे समजते. बस स्थानक परिसरातील नागरिकांनी या महिलेच्या अंगावरील आग विझवून तिला उपचारासाठी मालवण ग्रामीण रुग्णालयात आणले. येथे तिच्यावर प्राथमिक उपचार करून तिला ओरोस जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मालवण पोलिसांनी रुग्णालयात येऊन माहिती घेतली. पुढील तपास पोलीस करत आहेत. भर वस्तीत घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!