15.3 C
New York
Saturday, March 22, 2025

Buy now

भाजपच्या पार पडलेल्या कार्यकारणी निवडीमध्ये माझा काहीच संबंध नाही | शहर उपसंघटक कृष्णा लाखे

मंत्री दीपक केसरकर यांचा मी कार्यकर्ता…

सावंतवाडी : भाजपची नुकतीच कार्यकारणी बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये विविध पदांच वाटप करण्यात आलं आणि त्यामध्ये विनाकारण माझ्या नावाचा उल्लेख केला गेला त्यामुळे मी सांगू इच्छितो मी मंत्री दीपक भाई केसरकर शिंदे गट यांचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आणि त्यांनी मला शहर उपसंघटक हे पद दिलेले आहे आणि त्यानुसार जबाबदारीने मी काम करत आहे. असा खुलासा शहर उपसंघटक कृष्णा लाखे यांनी केले.

दरम्यान आमचा समाज मंत्री दीपक भाई केसरकर यांच्या पाठीशी ठामपणे कायम उभा राहील. माझ्या समाज बांधवांचा व माझा इतर कोणत्याही पक्षाशी संबंध नाही. दीपक भाई केसरकर यांनी माझ्यावर दिलेली जबाबदारी मी यशस्वीरित्या पार पडणार आहे कारण आमच्या समाजाला दीपक भाई केसरकर यांचाच एक मोठा आधार आहे. विनाकारण माझ्या समाज बांधवांमध्ये गैरसमज होऊ नये व माझ्या नावाची बदनामी होऊ नये यासाठी मला हे स्टेटमेंट द्यावे लागत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!