मालवण : मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी डॉ. चेतन पाटील याचा जामीन अर्ज आज जिल्हा न्यायालयाने फेटाळला.
शिवपुतळा कोसळल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेला बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्याने जामीनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज सुनावणी झाली. सरकारी पक्षाची बाजू जाणून घेतल्यानंतर प्रमुख जिल्हा न्यायाधीश एच. डी. गायकवाड यांनी चेतन पाटील याचा जामीन अर्ज फेटाळला. सरकारी पक्षाच्या वतीने अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील गजानन तोडकरी, रुपेश देसाई यांनी काम पाहिले.