16.2 C
New York
Monday, October 14, 2024

Buy now

प्रशांत पवार याला अटकपूर्व जामीन मंजूर 

कोलगाव येथील अक्षय साईल आत्महत्याप्रकरण

कणकवली : सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथील अक्षय जनार्दन साईल याला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रशांत सुभाष पवार (रा. भोमवाडी, कोलगाव) याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. बी. गायकवाड यांनी २५ हजार रुपयांचा सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

सावंतवाडी येथील अजित मठकर यांची गाडी प्रशांत पडते (रा. कोलगाव) याच्या सांगण्यावरून तक्रारदार जनार्दन साईल यांचा मुलगा अक्षय याने मुंबई येथील परवेझ शेख व इतरांना ठरवून दिली होती. तिचा अपघात झाल्याने व विमा मिळत नसल्याने गाडीचा खर्च देण्यासाठी गाडीमालक अजित मठकर याने अक्षय याच्याकडे पैशांसाठी तगादा लावला होता. ७ लाख ८० हजार रुपयांपैकी ५ लाख ३० हजार गाडीमालकाला मिळाले होते. उर्वरित २ लाख ५० हजार येणेबाकी असल्याने त्याने अक्षय याला फोन कॉल केले होते. पैसे देण्याची जबाबदारी परवेझ शेख व पडते यांनीही नाकारली होती. त्यामुळे अक्षय तणावामध्ये होता. ३ सप्टेंबर रोजी अक्षयला अजित मठकर, प्रशांत पवार, संकेत माळी व शाम् साळगावकर यांनी मारहाण केली होती. त्या तणावाखाली अक्षयने माडखोल धरणात आत्महत्या करून आरोपींची नावे लिहून ते आत्महत्येस जबाबदार असल्याचे म्हटले होते. या प्रकरणी १३ जणांवर गुन्हा दाखल होता. त्यातील पाचजणांना अटक झाली होती. यापैकी प्रशांत याने अटकपूर्व जामिनासाठी दाखल अर्जावर सुनावणी होऊन २५ हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर करताना त्याला तपासात सहकार्य करावे, तपासात हस्तक्षेप करू नये, आदी अटी घातल्या आहेत. संशयितांच्यावतीने अॅड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!