मालवण : मालवण तालुक्यातील काळसे बागवाडी येथील रुपेश रवींद्र पावसकर (वय ३८) हा तरुण दि.१३ सप्टेंबर पासून बेपत्ता झाला आहे. याबाबतची खबर त्याचा चुलत भाऊ संदीप पावसकर याने मालवण पोलीस ठाण्यात दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रुपेश पावसकर हा घरात कोणालाही न सांगता निघून गेला असून घरी परतलेला नाही. त्याच्या कुटुंबियांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तो सापडून आलेला नाही. या व्यक्तीविषयी कोणास माहिती मिळाल्यास त्यांनी मालवण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. याबाबत कट्टा पोलीस दुरक्षेत्रचे पोलीस कर्मचारी प्रकाश मोरे अधिक तपास करत आहेत.