संदेश सावंत यांच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव
कणकवली | मयुर ठाकूर : माझा वाढदिवस माझे सहकारी गेली २६ वर्षे साजरा करत आहेत. यावेळी काही सहकाऱ्यांनी मला विधानपरिषद आमदार होण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु मी एवढंच सांगेन, नारायण राणे हाच माझा पक्ष आहे. यापूर्वी ही विरोधकांनी मला प्रलोभने दाखवून फोडण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनाही मी शेवटपर्यंत नारायण राणेच हाच माझा पक्ष असून कुठल्याही पदासाठी मी काम करीत नाही. माझ्या पुढील आयुष्यातील शेवटच्या क्षणापर्यंत जणसेवा करणार असल्याचे प्रतिपादन युवा संदेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी केले. सांगवे – कनेडी येथे संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या सुवर्णमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी कै. सुधीर सावंत यांच्या स्मरणार्थक स्वर्ग रथाचे लोकार्पन करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, विजय भोगटे, सुरेश सावंत, सुरेश ढवळ, सरपंच संजय सावंत, सुनील घाडीगावकर, संतोष घाडीगावकर, सानिका गावकर, गणपत सावंत, मंगेश बोभाटे उपसरपंच प्रफुल्ल काणेकर, रॉबर्ट डिसोझा, पप्पू गावकर, विनोद सावंत, अनिल पांगम, तसेच संदेश प्रेमी व कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तत्पूर्वी सकाळी भिरवंडे येथील निवासस्थानी ही भिरवंडे गावच्या वतीने ही त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी श्रीमती सुजाता सावंत, संजना सावंत, गणपत सावंत गुरुजी, मोहन सावंत, माजी चेअरमन संतोष सावंत, बद्रीनाथ सावंत, श्रीकांत सावंत, सुनील सावंत सुभाष सावंत, व गावातील महिलांवर्ग आणि ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशाळेच्या वतीनेही शुभेच्छा देण्यात आल्या मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी व शालेय समिती चेअरमन आर एच सावंत आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
संदेश सावंत म्हणाले, परमेश्वर व राजकीय गुरु केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आशीर्वाद पाठीशी असल्याने अनेक पदे ही मिळतच जातील. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जोपासत विविध उपक्रम राबवण्यासाठी हा वाढदिवस साजरा केला जातो. लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांना उमेदवारी हा चांगला योग असून कार्यकर्त्यांनी आपल्या बूथ वर ८०% टक्के मतदान हे नारायण राणे यांना देऊन माझ्या वाढदिवसाच गिफ्ट द्यावं असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.