0.2 C
New York
Wednesday, December 4, 2024

Buy now

कणकवलीत मुख्याधिकारी ॲक्शन मोडवर

 अनधिकृत बोर्डवर कारवाई ; अनेकांचे धाबे दणाणले

कणकवली : कणकवली शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत बोर्ड, बॅनर, फुटपाथवर दुकाने लावलेल्यांवर बुधवारी कणकवली नगरपंचायत चे मुख्याधिकारी विशाल खत्री हे ॲक्शन मोडवर उतरलेले पहायला मिळाले. कणकवलीत बुधवारी सायंकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. तर काहींवर दोनशे रुपये प्रमाणे कारवाई करण्यात आली. तर काहींचे बोर्डच ट्रॅक्टर मध्ये टाकुन घेऊन गेले.  कणकवली शहरात फुटपाथवर बोर्ड लावणाऱ्याचे आणि फुटपाथवर बसुन व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

या कारवाईत कणकवली नगरपंचायतचे वरिष्ठ लिपिक किशोर धुमाळे, स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत, कर्मचारी प्रवीण गायकवाड, प्रशांत राणे, तुषार मोरे, विशाल होडावडेकर व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!