10.6 C
New York
Tuesday, October 15, 2024

Buy now

आरक्षण रद्द करणार म्हणणाऱ्या राहुल गांधी,आणि काँग्रेस चा खरा चेहेरा जनते समोर आला

पंतप्रधान नरेंद्र मोदी असे पर्यंत देशातील आरक्षणाला कोणीच हात लावू शकणार नाही

भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी घेतला काँग्रेस आणि गांधी यांचा समाचार

कणकवली | मयुर ठाकूर : राहुल गांधी आणि काँग्रेस यांचा आरक्षण विषयी खरा चेहरा सर्वांसमोर आला आहे. त्यांनी याच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमच्या एनडीए च्या नेत्यांवर टीका केली. ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत तोपर्यंत आरक्षण असेल. ज्या दिवशी देशात कॉंग्रेसच्या विचारांच सरकार येईल त्या दिवशी आरक्षणाची उलटी गिणती सुरू होईल. याची जाणीव देशाच्या जनतेने घ्यावी. परंतु जोपर्यंत या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आहे तोपर्यंत कोणीही आरक्षण या विषयाला हात लावू शकत नाही, असा विश्वास भाजप प्रवक्ते, आम. नितेश राणे यांनी व्यक्त केला.

यावेळी ते कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते.

पुढे आ. नितेश राणे म्हणाले, अमेरिकेत बसलेले काँग्रेसचे राहुल गांधी हे जे जे बोललेले आहेत त्यांचा पूर्ण इंटरव्ह्यू जनतेने पाहिलेला आहे. जिथून यांना पॅकेट येत तिथल्या नवीन बापाला संरक्षण देण्यापेक्षा यांनी स्वीकारावं की काँग्रेस आणि महाविकास आघाडी हे सत्तेत आल्यावर आरक्षण संपवून टाकणार आहेत आणी हे सत्य कोणीही पुसू शकत नाही.

धारावि प्रकल्प हे ठाकरे कुटुंबीय आणि मतोश्रीसाठी आता वसुलीचे केंद्र झालेलं आहे. त्यांना धारावी करांशी काहीही लेन – देणं नाही. विकास होणार आहे. आपल्या घरापर्यंत कंटेनर कसे पोहोचतात, त्यासाठी ब्लॅकमेलिंग कशी करायची, लोकांना वेठीस कसे धरायचे, मुंबईच्या विकासाच्या विरोधात कसे वागायचे, हा एक कलमी कार्यक्रम ठाकरे आणि त्यांच्या पूर्ण वसुली गँगचा दिसत आहे. त्यांना धारावीकरांशी काहीही लेन देणं नाही. परंतु धरावी करांचा मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे. मोठ्या प्रमाणात प्रकल्प तिथे उभा राहणार आहे. आणि धरावी करांच्या मनाविरुद्ध काहीच होत नसल्यामुळे कुठेही भीतीचा विषय राहत नाही.

हिंदूंची बाजू घेणे म्हणजे दंगल भडकाविणे नाही. देशात, राज्यात राहणारा हिंदू हा सुरक्षित असला पाहिजे. संविधानाप्रमाणे आपले अन्य हक्क मिळतात, अन्य धर्म आपले सण साजरे करतात त्याचप्रमाणे हिंदूंनी देखील आर्थिक सक्षम व्हावं, त्यांना आपलं हक्क मिळाले पाहिजे यासाठी त्यांची आम्ही बाजू घेत असू तर त्याला दंगली भडकवन म्हणत नाही. आतापर्यंत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदूंची बाजू घेतली, हिंदूंच हिट जोपासलं, हिंदुत्वाच्या नावाने पक्षाचा आवाज मोठा केला. म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांना तेव्हा दंगली भडकवायच्या होत्या, असा आरोप संजय राऊत यांना बाळासाहेब ठाकरेंवर करायचा होता का.?

आमच्या भाजप पक्षात राष्ट्रभक्त, राष्ट्रप्रेमी मुसलमान आहेत. राष्ट्रभक्त, राष्ट्रप्रेमी मुसलमानांच्या विरोधात आम्ही नाही. माझ्या भाषणात जिहादी आणि बांग्लादेशी यांच्याबरोबर कोणीही व्यवहार करू नये. व्यवहार केलेला पैसा ते लोक देश विरोधात, धर्मविरोधी कामासाठी वापरतात असा आरोप देखील आ. नितेश राणे यांनी केला. जे मुसलमान राष्ट्र प्रथम समजतात, वंदे मातरम आपल्या मुखातून बोलतो ते आपल्या हक्काचे नागरिक आहेत.

संजय राजाराम राऊत झालाय गजनी. याचा मालक मुख्यमंत्री असताना हायकोर्टात जज असलेल्या न्यायाधीश यांना भेटायला गेले होते. अनिल परब देखील तेव्हा त्यांच्या सोबत होते. तेव्हा उद्धव ठाकरेंनी न्यायव्यवस्थेवर प्रभाव टाकण्यासाठी दौरा काढला होता का ? आमच्या हिंदू धर्मात गणेश चतुर्थीच्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे न्यायाधीशांच्या घरी गणपतीच्या आरतीसाठी जा असतील तर ह्या हिरव्या सापांना मिरच्या का झोंबतात.

संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आमच्या घराबद्दल चिंता करण्याअगोदर आपले महाविकास आघाडीचे उमेदवार, कार्यकर्ते पाहावेत. कित्येक लोकांना महायुतीमध्ये लढायची इच्छा आहे. त्यांनाही माहिती आहे महाविकस आघाडीच्या कोणत्याही पक्षाच तिकीट मिळालं तरी आमचं निवडून येणं काही खर नाही. त्यामुळे दुसऱ्यांच्या घरात डोकावण्यापेक्षा स्वतःच्या घरात काय चालले आहे ते पहा.

हाजी हरफतशी आम्ही बोललो आहे, ते आमच्या पक्षाचे आहेत. हरफत यांच्या कुटुंबीयांशी आमचे चांगले संबंध आहेत. जो मुसलमान या तिरंग्याचा आदर करतो, तो आमचा आहे. जो मुसलमान या देशाला मानतो तो आमचा आहे. अजित पवार हे महायुतीत आहेत, त्यांच्याशी आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतील. तसेच संकेत बावनकुळे यांच्या बद्दल पोलीस तपास करीत आहेत. राज्यातील मुसलमानांना एकत्र येण्याचा अधिकार आहे. पण हिंदूंना डीवचण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर हिंदू गप्प बसणार नाहीत, असा इशाराही भाजप प्रवक्ते आ. नितेश राणे यांनी दिला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!