1.6 C
New York
Wednesday, February 12, 2025

Buy now

भर वस्तीत आलेल्या नागाला सर्पमित्रांकडून जीवदान

कणकवली | प्रतिनिधी :कणकवली शहरातील सुतारवाडी येथे भर वस्तीत आलेल्या नागाला कलमठ येथील यश वर्दम या सर्पमित्र युवकाने शिताफिने पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. सुतारवाडी येथील प्रतीक मेस्त्री यांच्या घरात सर्वजण गणपतीची आरती करण्याच्या तयारीत असताना भर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अस्सल नाग घरानजीक आढळून आला. त्यानंतर घरातील कोणीतरी कलमठ येथील सर्पमित्र यश वर्दम यांना याबाबत कळविले. कुंभवडे येथे सर्प पकडण्यास शिकलेल्या व आतापर्यंत हजारो सर्प पकडण्याचा अनुभव असलेल्या यश याने त्याच्याकडील सर्प पकडण्याच्या काठीने शिताफीने हा नाग पकडून एका बरणीत भरून नैसर्गिक अधिवासात सोडला. यशच्या या धाडसाचे सर्वांनी कौतुक केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!