-10.2 C
New York
Tuesday, January 21, 2025

Buy now

चुलीत आग पेटवत असताना ; अचानक साडीला लागली आग 

महिला गंभीर जखमी ; जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी केले दाखल

कुडाळ : पाणी तापवण्यासाठी चुलीत आग पेटवत असताना साळगांव गायचोरवाडी येथील काशिबाई बापू गायचोर ( ७५ ) या वृद्ध महिलेच्या साडीने पेट घेतला. ही महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना गुरुवारी सकाळी ४.३० वा घडली.

मुलगा मुंबईला जाणार असल्याने काशिबाई गायचोर ही चुलीत आग पेटवण्यासाठी पहाटे ४.३० शा गेली होती. यानंतर तिने आग पेटविण्यासाठी रॉकेल ओतले.

यावेळी आगीचा फडका उडाला व यात तिच्या साडीने पेट घेतला. यावेळी तिने ओरड मारल्यावर घरातील सर्व व्यक्ती तिथे आल्या. व आग विझवण्याचा प्रयत्न केला. यानंतर तिला कुडाळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले याठिकाणी प्राथमिक उपचार करून तिला जिल्हा रुग्णालय ओरोस येथे अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!