16.2 C
New York
Monday, October 14, 2024

Buy now

वेंगुर्ल्यातील ४६ भजन मंडळांना साहित्य संचाची भेट

भाजपा नेते संदिप गावडे यांचा उपक्रम.

वेंगुर्ला : भाजप हा आध्यात्मिक गोष्टींशी निगडीत आहे. त्यामुळे पंतप्रधानांपासून ते देवेंद्र फडणवीसांपर्यंत सर्वच नेते धार्मिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देतात. म्हणून पालकमंत्री रविद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनातून आपण स्वखर्चाने भजन साहित्य देत असल्याचे प्रतिपादन भाजपाच नेते संदिप गावडे यांनी वेंगुर्ला येथे केले.

आध्यात्मिक चळवळीला बळ देण्यासाठी गावातील भजन मंडळांना भाजप व भाजपाच नेते संदिप गावडे यांच्यामार्फत सिधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला या तिन्ही तालुक्यातील भजन साहित्य संच देण्यात आले. याचा शुभारंभ पालकमंत्री रविद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आला. वेंगुर्ला तालुक्यातील सुमारे ४६ भजनी मंडळांना येथील भाजप कार्यालयात भजन साहित्य संच वितरीत करण्यात आले. यावेळी प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, बाबली वायंगणकर, वसंत तांडेल, दादा केळुसकर, प्रितेश राऊळ, विष्णू परब, प्रसाद पाटकर, शरद मेस्त्री, सुधीर गावडे, सुभाष खानोलकर, बाबू भोसले, सुनिल घाग, कार्तिकी पवार यांच्यासह बुथप्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!