19 C
New York
Monday, October 14, 2024

Buy now

देवगड शेठ म.ग.हायस्कूलमध्ये महावाचन उत्सव संपन्न…!

देवगड : समग्र शिक्षा अभियान अंतर्गत ‘ महावाचन उत्सव ‘ सन २०२४ तालुकास्तर ग्रंथप्रदर्शन शेठ .म. ग . हायस्कुल देवगड येथे संपन्न झाला . देवगड शिक्षण विभाग तथा गट संसाधन केंद्र पं .स. देवगडच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. महावाचन उत्सवाच्या निमित्ताने जेष्ठ कवियेत्री अनुराधा दिक्षित , मराठी भाषा अभ्यासक संजीव राऊत व एन , एस पंत वालावलचे ग्रंथपाल शेवाळे तर एन .एस पंत वालावलचे उपप्राचार्य शेटये , शेठ म .ग . हायस्कुलचे मुख्याध्यापक घोलराखे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते . ‘

यावेळी मि.स. पवार , देवगड नं१ , जामसंडे नं१ या प्रशालेच्या विदयार्थ्यांनी थोर महापुरुषांच्या वेषभुषा परीधान करून ग्रथदिंडीमध्ये सहभाग घेतला . या दिडींमध्ये विदयार्थी मोठया संख्येने सहभागी झाले होते . यावेळी उपस्थित मान्यवरांचा पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला .
यावेळी वाचाल तर वाचाल आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला पुस्तक वाचायला वेळ मिळत नाही परंतु भविष्यकाळात वाचना शिवाय पर्याय नाही . विदयार्थी मोबाईल , टिव्ही यांच्यात इतका आहारी गेला आहे कि, त्यामुळे त्याला वाचनाचा विसर पडला आहे . वाचनाचे महत्व पटवुन देताना जेष्ठ कवियेत्री अनुराधा दिक्षित आजकाल वाढदिवसाला इतर वस्तु भेट देण्यापेक्षा पुस्तक भेट म्हणून दयावे असे आवाहन त्यांनी केले .

मराठी भाषा अभ्यासक संजीव राऊत यांनी मुलांना वाचनाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.तर एन.एस पंत वालावलचे ग्रंथपाल शेवाळे म्हणाले कि हे विश्व फार मोठे आहे . विविध प्रकारचे अनुभव या पुस्तकाच्या माध्यमातुन देता येईल असे ते म्हणाले .एन.एस पंत वालावलचे उपप्राचार्य शेटये यांनी वाचन हे ज्ञानाचे भांडार आहे . साहित्यातुन आपल्याला प्रेरणा मिळते.
ग्रंथप्रदर्शनाला उमा बर्वे लायब्ररी, एन .एस पंत वालावलकर जामसंडे हायस्कुल, शेठ म .ग. हायस्कुल मधीत ग्रथालयातील विविध साहित्यांचा सामावेश होता. या कार्यक्रमांसाठी विविध शाळांमधुन विद्यार्थी , शिक्षक व मोठया संख्येने ग्रंथप्रेमी उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सायली मोंडकर. तर आभार अनुराधा कदम यांनी मानले .

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!