10.6 C
New York
Tuesday, October 15, 2024

Buy now

कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपच्या वतीने महाविकास आघाडीच्या निषेधार्थ आंदोलन 

विरोधकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण करू नये

फलक दखवुन महाविकास आघाडीच्या नेत्यांचा केला निषेध

कणकवली : तालुका भाजपा च्या माध्यमातून कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाविकास आघाडीच्या निषेधार्थ निषेध आंदोलन करण्यात आले. यादरम्यान संतोष कानडे व प्रकाश पारकर बुवा यांनी महाविकास आघाडीवर टीका करणारे भजन गीत सादर केले. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका करण्यात आली.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी.. जय शिवाजी अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. तसेच यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जिल्ह्यात येऊन वातावरण बिघडू पाहणाऱ्या नेत्यांचा निषेध केला गेला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मालवण राजकोट येथील पुतळा कोसळल्यानंतर विरोधक त्यावर राजकारण करत असल्याच्या निषेधार्थ कणकवलीत भाजपने हे आंदोलन केले.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे कणकवली तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, जिल्हा चिटणीस संतोष कानडे, माजी जि.प. अध्यक्षा संजना सावंत, भाजपा तालुका उपाध्यक्ष सोनू सावंत, बुवा प्रकाश पारकर, मेघा गांगण, कलमठ उपसरपंच स्वप्निल चिंदरकर, संतोष पुजारे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सर्वेश दळवी, समीर प्रभूगावकर, गणेश तळगावकर, माजी पंचायत समिती सदस्य महेश लाड, परशुराम झगडे, संदीप सावंत, बबलू पवार, चिन्मय तळेकर, सागर पवार, श्रेयस चिंदरकर, प्रशांत राणे, विजय इंगळे, प्रसाद देसाई, मंदार मेस्त्री, महेश मेस्त्री, रोहित ठाकूर, अनिल घाडीगावकर आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी श्री. तळेकर म्हणाले, मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राजकारण करण्यात येत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत दिलगिरी देखील व्यक्त केली. काही विरोधकांनी आमच्या जिल्ह्यामध्ये येऊन शिवप्रेम दाखवण्याची गरज नाही. गड किल्ले व छत्रपतींचा इतिहास जागृत ठेवण्याचे काम आम्ही करत आहोत. ज्यावेळी विशालगडावर अतिक्रमण हटवण्यासाठी प्रयत्न चालू होते त्यावेळी तुम्ही कुठे होता ? कर्नाटक मध्ये काँग्रेसचे सरकार आल्यानंतर छत्रपतींचा पुतळा हटवण्यात आला. त्यावेळी तुम्ही कुठे होता ? हा अपघाताने पुतळा पडलेला आहे, त्यावर राजकारण करण्याची गरज नाही. या घटनेबाबत राज्यातील जनता विरोधकांना माफ करणार नाही. विरोधकांनी या ठिकाणी येत सातत्याने राजकारण केल्यामुळे ही बातमी देशभर पसरण्याचं काम करत छत्रपतींचा अपमान विरोधक करत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जनता त्यांना जागा दाखवून देईल, हा अपमान छत्रपतींचा असल्यामुळे तुम्हाला जनता सोडणार नाही असा इशारा दिला.

यावेळी सदरच्या आंदोलनात महाविकास आघाडीच्या नेत्यांचे निषेध व्यक्त करणारे फलक व भारतीय जनता पार्टीचे झेंडे घेऊन कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!