8.5 C
New York
Tuesday, December 10, 2024

Buy now

महाविकास आघाडीतर्फे कुडाळमध्ये जोडे मारो आंदोलन

राजकोट दुर्घटना प्रकरणी राज्य सरकारचा केला निषेध.

कुडाळ : महाविकास आघाडीच्या वतीने कुडाळ गांधी चौक येथे आज सरकारविरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आले. राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्याला राज्य शासन जबाबदार आहे त्यामुळे मुख्यमंत्री, गृहमंत्री, संरक्षणमंत्री आणि पालकमंत्री यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी महाविकास आघाडीतर्फे करण्यात आली. सरकार विरोधातल्या घोषणांनी पदाधिकाऱ्यांनी परिसर दणाणून सोडला.

२६ ऑगस्ट रोजी राजकोटमध्ये उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. त्याला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या वतीने केला जात आहे. त्यामुळे या सरकारच्या विरोधात संपूर्ण राज्याभर सरकारला जोडेमारो आंदोलन केले जात आहे. कुडाळ गांधी चौक येथे सुद्धा महाविकास आघाडीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य शासनाविरोधात घोषणा देण्यात आल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार देखील करण्यात आला. प्रत्यक्ष जोडे मारो आंदोलनाच्या वेळी मात्र पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करत मुख्यमंत्री, उपमुख्यामंत्री, पालकमंत्री या नेत्यांचे फोटो असलेला बॅनर हिसकावून घेतला. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यसरकारवर जोरदार टीका केली.

या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, शिवसेना ठाकरे गट युवासेनेचे जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभू, शिवाजी घोगळे, प्रसाद रेगे, प्रकाश जैतापकर, अभय शिरसाट, संतोष शिरसाट, गंगाराम सडवेलकर, तरबेज शेख, अय्यास खुल्ली, अजीम खान, नझिर शेख, आत्माराम ओटवणेकर,जयराम डिगसकर, लालू पटेल, प्रसाद सावंत-भोसले आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!