21.6 C
New York
Thursday, May 23, 2024

Buy now

आंबोलीत अपघात ; रुग्णवाहिका नसल्याने पोलिसच धावले मदतीला

सावंतवाडी/ आंबोली : ट्रकने ॲव्हेजर दुचाकीला धडक दिल्यामुळे बेळगाव येथील तिघे युवक गंभीर जखमी झाले आहेत. ते एकाच दुचाकीने प्रवास करीत होते. ही घटना आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आंबोली घाटात नानापाणी वळणावर घडली. अपघातानंतर ट्रक चालकाने पळ काढला. त्यामुळे ते युवक काही काळ रस्त्यावरच पडले होते.

त्यानंतर याबाबतची माहिती प्रवाशांनी पोलिसांना दिल्यानंतर रुग्णवाहिकेला पाचरण करण्यात आले. परंतु ती उपलब्ध न झाल्यामुळे अखेर पोलिस हवालदार दत्ता देसाई व सहकाऱ्यांनी त्या तिघांनाही आपल्या व्हॅन मधून सावंतवाडी रुग्णालयात दाखल केले. जीलानी मेहबूब शेख (वय २७), अजाण इस्ताक शेख (वय २६), नुर अहमद सनदी (वय ३०, सर्व रा.बेळगाव) अशी त्यांची नावे आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!