0.2 C
New York
Wednesday, December 4, 2024

Buy now

आचार संहितेची ऐशी तैशी ; शरद पवारांसाठी डाव टाकला, पण..

भाजपच फसलं ; निवडणुक विभागाच्या वाहनावर कमळाचे स्टिकर

वर्धा : वर्धा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आज अमर काळे निवडणुकीसाठी अर्ज दाखल करीत आहेत. यासाठी पोलिसांनी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पाळली जाते का ? यासाठी निवडणुक विभागाच्या गाड्या पाठवल्या होत्या. मात्र निवडणुक आयोगाने पाठवलेल्या गाड्यावरच कमळाचं चिन्ह असल्याने ठाकरे गटाने थेट पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

वर्धेत आज महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष स्वत: शरद पवार उपस्थित राहणार असून मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. या सभेच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी निवडणुक विभागाकडून वेगवेगळे पथक बनवून वाहने पाठविण्यात आली आहे. यापैकी निवडणूक विभागाच्या एका वाहनावर चक्क कमळाचे स्टिकर असल्याचे दिसून आले.

निवडणूक विभागाच्या वाहनावरच चिन्ह असल्याने शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यानंतर ठाकरे गटाने थेट रामनगर पोलीस स्टेशन गाठले. याबाबत तक्रार केली आहे. ठाकरे गटाचे जिल्ह्याध्यक्ष आशिष पांडे यांनी याबाबत तक्रार दाखल केली असून आदर्श आचार संहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!