13.3 C
New York
Monday, May 20, 2024

Buy now

दिपक केसरकर यांच्या थंड दहशतीचे पितळ उघडे पडले ; रुपेश राऊळ

सावंतवाडी : दहशत, दहशत म्हणून भुई थोपणारे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांच्याकडे आत्मसंरक्षण बंदुक असल्याचे प्रशासनाने उघड केल्याने केसरकर यांच्या थंड दहशतीचे पितळ उघडे पडले आहे असे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी सावंतवाडी तालुक्यातील १३ शस्त्र परवाना धारकांना बंदुका (शस्त्र) पोलिस ठाण्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जमा करण्याचे आदेश दिले आहेत त्यामध्ये दिपक केसरकर यांचे नाव असल्याने प्रशासनाने बुरखा पांघरून दहशतीवर बोलणाऱ्या केसरकर यांचा बुरखा टराटरा फाडला आहे असे राऊळ यांनी म्हटले आहे.केसरकरानी स्वतःकडे शस्त्र असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा दहशतवाद मुक्त म्हणून जाहीर केला का? अन्यथा जर खरोखरच जिल्हा दहशतमुक्त आहे तर तुम्हाला शस्त्र ची गरज का लागते? ते पण केसरकर यांनी सर्वसामान्य जनतेला सांगणे गरजेचे आहे.

दहशत..दहशत म्हणून दोन विधानसभा निवडणुका लढवणारे केसरकर त्याच नेत्या सोबत हातमिळवणी करून मांडीला मांडी लावून बसत आहेत. जनकल्याणाच्या योजना राबविल्या नाहीत तसेच रोजगारही उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे सोज्वळ चेहरा घेऊन वावरणाऱ्या केसरकर यांच्याकडील शस्त्र पोलीस ठाण्यात जमा करण्याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी आदेश पारित केले आहेत त्यामुळे केसरकर यांचे आणखी एक पितळ उघडे पडले आहे असे रूपेश राऊळ यांनी सांगितले. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ, सिंधुदुर्ग जिल्ह्यात केसरकर यांच्या भूलभुलैया, भूलथापांना बळी पडणारे लोक, तरुण आता खरा चेहरा ओळखून आहेत. त्यामुळे केसरकर मतदारसंघातही फिरत नाहीत. फक्त पत्रकार परिषद घेऊन अवसान निर्माण करत आहेत असे राऊळ यांनी सांगितले.

ते म्हणाले, बंदूक शस्त्र पोलीस ठाण्यात जमा करण्याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी आदेश पारित केले आहेत. त्यामध्ये दिलेल्या कारणांमुळे केसरकर सपशेल उघडे पडले आहेत. हत्ती, गवा रेडा, वन्यप्राणी लोकवस्ती मध्ये घुसून शेती बागायती चे प्रचंड नुकसान करत आहेत. त्या शेतकऱ्यांना शस्त्र परवाना मिळवताना नाकेनऊ येतात. तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी शेतकरी बागायतदार यांना शस्त्र परवाना नुतनीकरण करून देण्यासाठी मोठा मानसिक त्रास दिला तेव्हा केसरकर गप्प बसले. मात्र स्वतः साठी बंदुक शस्त्र परवाना मिळवला यावरून केसरकर यांचा दुटप्पीपणा उघड झाला आहे. केसरकर यांना शेतकरी बागायतदार यांच्या समस्यांचे देणेघेणे नाही हेही वेळोवेळी समोर आले आहे असे राऊळ यांनी सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!