मालवण : मालवण मधील राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटने प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या दोन संशयित आरोपी पैकी कोल्हापूर येथील बांधकाम सल्लागार चेतन पाटील याला काल पोलीसांनी अटक केल्यावर आज त्याला मालवण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चेतन पाटील याला दि. ५ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.