राजकोट येथील दुर्घटना स्थळाची करणार पाहणी
मालवण : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याची दुर्घटना जिथे घडली, त्या मालवण राजकोट किल्ल्याला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले रविवार १ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता भेट देऊन दुर्घटना स्थळाची पाहणी करणार आहेत.
मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची दुर्घटना घडल्याचे कळताच ना. रामदास आठवले यांनी या दुर्घटनेचा रिपब्लिकन पक्षातर्फे तीव्र निषेध व्यक्त करून सखोल चौकशीची मागणी केली होती. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची ही मागणी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची दुर्घटना घडल्यामुळे सर्वांच्याच भावना दुखावल्या आहेत. मात्र यातून धडा घेऊन राज्य सरकार ने अधिक सुरक्षेची काळजी घेऊन नव्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा त्याच ठिकाणी राजकोट किल्ल्यावर उभारला पाहिजे. अशी आपली मागणी असून यासाठी ना.रामदास आठवले रविवारी १ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता मालवण मधील राजकोट किल्ल्याला भेट देणार आहेत. अशी माहिती हेमंत रणपिसे यांनी दिली आहे.