अजित पवार मालवण येथील राजकोट किल्ल्यावर दाखल
पुतळा कोसळलेल्या भागाची केली पहाणी
कणकवली : मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पहाणीकरिता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मालवण राजकोट येथे आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन अजित पवारांचे स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सिंधुदुर्ग चे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.