कणकवली : मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पहाणीकरिता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मालवण राजकोट येथे आले होते. यावेळी त्यांच्या गाडीचे सारथ्य राष्ट्रवादी अजित पवार गटाच( पक्षाचे ) जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी केले.
अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून अबीद नाईक यांची ओळख आहे. अबीद नाईक यांनी सारथ्य केल्याने त्यांचे विडिओ करण्यासाठी अनेक कॅमेरे पुढे सरसावले.