कणकवली : कोकण रेल्वे,RPF कणकवलीचे निरीक्षक श्री.राजेश सुरवाडे यांनी आज वेंगुर्ला येथील साहस प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग संस्थेला भेट दिली. दिव्यांग विध्यार्थी व दिव्यांग बांधव यांच्याशी संवाद साधला त्यांना रेल्वे प्रवासात येण्याऱ्या अडचणी जाणून घेतल्या व रेल्वे प्रवासात दिव्यांग बांधवांना आपण सर्वतोपरी सहकार्य करू व जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी प्रयत्न करू असें आश्वासन दिलें.
संस्थेच्या अध्यक्षा रुपाली पाटील यांनी शाल श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन श्री. राजेश सुरवाडे यांचा सन्मान केला. संगीत विशरद पडवी प्राप्त केलेल्या श्री सचिन पालव यां दिव्यांग बंधूचा सत्कार निरीक्षक श्री. राजेश सुरवडे यांच्या शुभहस्ते यावेळी करण्यात आला. साहेबांनी दिव्यांग गुणवंताना छोटेसे बक्षीस देत सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी दिव्यांग विकास केंद्र वेंगुर्ला च्या सचिव श्रीम.प्रणाली पेंडसे मैडम, विश्वस्त श्रीम. ज्योती मडकईकर, सदस्य श्री.सचिन पालव, श्रुती पाटील, सुंनंदा मोकाशी व इतर हितचिंतक उपस्थित होतें.